सन्मान माणुसकीचा

 Girgaon
सन्मान माणुसकीचा
सन्मान माणुसकीचा
See all

गिरगाव - एड्सविरोधी चळवळीतील लढा देणा-या सोशल अॅक्टिव्हिटीज इंटिग्रेशन (साई) या संस्थेला 17 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमीत्ताने 'ती'चा सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी

मराठी साहित्य संघ मंदिर, गिरगाव येथे करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर, भाजपा नेत्या शायना एनसी, बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेता जे. ब्रॅन्डन हिल, साई एनजीओचे संचालक विनय वस्त यांची उपस्थिती होती. यावेळी एड्स ग्रस्त रुग्णांनी आपले मनोगत मांडले.

एड्सविरूध्द जनजागृती ही काळाची गरज ओळखून 'साई' संस्थेचे संचालक विनय वस्त गेल्या २५ वर्षापासून देहविक्री करणाऱ्या महिल्यांच्या उत्कर्षासाठी झटत आहेत. या महिलांना आरोग्याविषयी जागरूक करणे, ज्या महिला देहविक्री व्यवसायाचा त्याग करू इच्छितात त्यांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी करणे तसेच या महिलांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील साई संस्था पार पाडत आहे.

Loading Comments