छु ले आसमान...

 Mumbai
छु ले आसमान...

प्रभादेवी - तथास्तू क्रिएशन आणि इंडियन म्युझिक प्रस्तुत छु ले आसमान या कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरमध्ये करण्यात आलं. इन एड ऑफ रेस्क्यू फाऊंडेशनने जलोटा वेलफेअर फाऊंडेशनच्या सहयोगाने हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाची संकल्पना भरत ओझा आणि नेहा रिझवी यांची होती. यामध्ये सुप्रिसिद्ध गायक डॉ. सुरेश वाडकर यांनी आपली कला सादर केली. त्याचबरोबर पद्मश्री अनुप जलोटा आणि गायिका नेहा रिझवी यांनीसुद्धा आपली गाणी सादर करत उपस्थितांचे मनोरंजन केले. हा संपूर्ण कार्यक्रम इन एड ऑफ रेस्क्यू फाऊंडेशनच्या अनाथ मुलींसाठी सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला कलाक्षेत्रातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली.

Loading Comments