26/11 च्या हुतात्म्यांना एक वेगळी श्रद्धांजली

मरीन ड्राईव्ह - 26/11 च्या भ्याड हल्ल्यात हुतात्म्य पत्करलेल्या पोलिसांना एका वेगळ्या पद्धतीने स्केट्स ऑन फायर या अकादमीतर्फे स्केटिंग चालवत शनिवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. नरिमन पॉइंट ते चरणी रोड येथील पोलीस जिमखाना पर्यंत स्केटिंग चालवत प्रभात फेरी काढण्यात आली. यात तब्बल 40-50 लहान मुले सहभागी झाले होते. या वेळी प्रभात फेरी दरम्यान बंदोबस्तासाठी उभ्या असलेल्या पोलिसांना गुलाबाचं फुल देण्यात आलं. या प्रभात फेरीसाठी स्केट्स ऑन फायर अकादमीचे संचालक अनुभव अरोरा देखील उपस्थित होते.

Loading Comments