Advertisement

दृष्टीहीन विद्यार्थ्यांनी रचले मानवी मनोरे


SHARES

दादर - प्रजासत्ताक दिनानिमित्त दादरच्या कमला मेहता अंध शाळेतल्या विद्यार्थिनींनी मानवी मनोरे रचत प्रात्यक्षिके दाखवली. त्यांच्यातील तालमेल, आत्मविश्वास आणि उत्साह एखाद्या डोळस व्यक्तीलाही लाजवेल. फक्त एवढेच नाही तर चक्क गायन, वादन आणि भाषण करून या विद्यार्थिनींनी प्रजासत्ताक दिन साजरा केला. या वेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रदीप व्यास यांनी उपस्थिती लावली.

दृष्टीहीन असूनही विविध खेळात सहभागी होणाऱ्या विद्यार्थिनींना महेश्वरी मंडळाच्या वतीने बक्षिस देऊन गौरवण्यात आले. खरच जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस काय नाही करू शकत हे या विद्यार्थिनींनी दाखवून दिले. त्यांच्या या जिद्दीला ‘मुंबई लाइव्ह’चा सलाम.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा