Advertisement

'अस्मिता'चे विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाचे धडे!


'अस्मिता'चे विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाचे धडे!
SHARES

परीक्षा संपवून दिवाळीची सुट्टी मिळाल्यानंतर विद्यार्थी विविध कोर्स किंवा शिबिरात भाग घेतात. काही जण या दिवसात क्रिकेटचे धडे, तर काहीजण कलेचे धडे घेत असतात. मात्र, जोगेश्वरीतील प्रसिद्ध असलेले अस्मिता विद्यालय विद्यार्थ्यांना शिबिराच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकासाचे धडे देत आहे. तेही गेली 32 वर्षे!


काय आहे या शिबिरात खास

11 ते 16 ऑक्टोबर 2017 असे 6 दिवसांचे शिबीर अस्मिता महाविद्यालयात आयोजित करण्यात आले असून, या शिबिरात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण, शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक विकास कसा होईल? यावर भर दिला जातो. या शिबिरात एकूण 125 विद्यार्थ्यांचा समावेश असतो. या विद्यार्थ्यांकडून 450 रुपये एवढी फी घेतली जाते. त्यामध्ये विद्यार्थ्यांना 6 दिवसात सर्व खाण्याची व्यवस्था, तसेच शाळेत राहण्याची व्यवस्था केली जाते.

मी याआधी सहाय्यक म्हणून काम केले आहे. मात्र यंदा माझ्यावर शाळेने शिबीर प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. या जबाबदारीमुळे मला खूप नवीन गोष्टी शिकताही येत आहेत.

निलिमा सोलकर, शिबीर प्रमुख


शिक्षक बजावतात महत्त्वाची भूमिका

या 6 दिवसीय निवासी शिबिरात शाळेचे शिक्षक, तसेच इतर कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. हे शिक्षक आळी-पाळीने मुलांसोबत रात्री शाळेत राहतात. मुलांची योग्य प्रकारे काळजी देखील या काळात घेतली जाते. मुलांना योगासने, शारीरिक व्यायाम तसेच विविध क्रीडा प्रकार यावेळी शिकवले जातात. 6 दिवसांत शिकलेली प्रात्यक्षिके मुले विविध मान्यवर, तसेच पालकांच्या समोर शेवटच्या दिवशी सादर करतात.

मी 9 वीमध्ये शिकत असून, शिबिराचे हे माझे 5 वे वर्ष आहे. 6 दिवसांमध्ये आम्हाला घरापासून लांब राहण्याची संधी मिळते आणि खूप शिकताही येते.

वैभव कनप, विद्यार्थी


असा असतो दिवसाचा दिनक्रम

  • सकाळी 5.30 वाजता सुरु झालेला या विद्यार्थ्यांचा दिनक्रम रात्री 11 वाजता संपतो. त्यामध्ये खालील प्रमाणे कार्यक्रम असतात.
  • चिंतन, योगासने, हलका आहार, स्नान आदी कार्यक्रम, गीत, गीताध्याय, गप्पागोष्टी, परिसर स्वच्छ ठेवणे, कपडे आणणे, डबे बाहेर ठेवणे
    कला-मार्गदर्शन, वृत्तपत्र वाचन, समुपदेशन, मनोरंजन तयारी, माहिती पट, प्रश्न मंजुषा यांसारख्या विविध कार्यक्रमांचा समावेश असतो.

रोज घरी घड्याळाच्या आवाजाने मी उठते. पण या 6 दिवसांत सनईच्या सुरांनी उठते. गीताध्यायासोबत, रोप मल्लखांब देखील मी शिकले. मला खूप मजा येते.

श्रद्धा गाडगीळ, विद्यार्थिनी


स्पेशल चाईल्ड असलेला ओम देखील घेतोय शिबिरात भाग

इतर मुलांप्रमाणे नसलेला ओम मयेकर (स्पेशल चाईल्ड) हा गेली 3 वर्षे इतर मुलांप्रमाणे या शिबिरात धडे घेतो. ओम हा आता 7 व्या इयत्तेत आहे.



हेही वाचा - 

'येथे' मिळतो गतिमंदांना खरा 'विश्वास'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा