Advertisement

'येथे' मिळतो गतिमंदांना खरा 'विश्वास'

गतिमंद मुलांनी तयार केले कागदी कंदील. कंदील करतायत रोजगार निर्मिती. कंदीलाच्या विक्रीतून स्वता:च्या पायावर उभे राहण्याची संधी

SHARES

बहुतांश पालकांच्या दृष्टीकोनातून गतिमंद मूल ही मोठी समस्या असते. परंतु या मुलांना योग्य शिक्षण आणि मार्गदर्शन मिळालं, तर ही मुलं सर्वसामान्य मुलांनाही लाजवतील, अशी कामं करतात. समाजात निर्धोकपणे वावरण्यासाठी 'या' मुलांना ज्या 'आत्मविश्वासा'ची गरज असते, तो मिळवून देण्यात मागील २५ वर्षांपासून 'विश्वास' ही संस्था मोलाचं काम करत आहे. या संस्थेच्या माध्यमातून आता या मुलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. दिवाळीच्या निमित्ताने संस्थेने या मुलांकडून अनेक वस्तू तयार करून घेतल्या असून या वस्तू विक्रीसाठी खुल्या बाजारात आणल्या आहेत. या वस्तूंची विक्री झाल्यास संस्थेच्या धडपडीला मोठा हातभार लागू शकेल.   

गतिमंद मुलांना साभांळणे, त्यांना शिकवणे यासाठी पालकांना तारेवरची कसरत करावी लागते. या मुलांच्या स्वभावलहरीनुसार, आवडी नुसार, न ओरडता त्यांच्याकडून काम करून घ्यावे लागते. ही कला साधली आहे ती विश्वास संस्थेच्या मुख्यध्यापिका मिना क्षीरसागर यांनी. तुम्ही कधीही या संस्थेत गेलात तरी ही मुलं तुम्हाला कामात व्यस्त दिसतात. सतत काम करत राहणे त्यांना आवडते.दिवाळीच्या दिवसात तर त्यांच्या आनंदाला उधाण येते. सध्या ही मुल ही व्यस्त आहेत ती दिवाळीसाठी कंदील तयार करण्यात. दिवाळीसाठी विविध आकाराचे कागदी कंदील, पणत्या रंगवणे, नक्षीदार पणत्या तयार करणे आदी कामे ही मुलं अगदी मन लावून करत आहेत. त्यांनी आतापर्यंत १०० हून अधिक कंदील विक्रीसाठी तयार आहेत. या मुलांनी एकदा काम हाती घेतले की ती  त्यात एवढी मग्न होतात की त्यांना आपल्या भोवतालच्या गोष्टींचाही विसर पडतो. अगदी कंदीलासाठी लागणारे कागद कापण्यापासून ते कंदील सजावटीपर्यंत अशी सर्व कामे ही मुलंच करतात.हे कंदील विकून मिळालेले पैसा हा त्यांच्या कामाचा मोबदला. ते पैसा किती आहेत, त्याची किंमत काय आहे, हे या मुलांना नाही कळत. पण पैसे मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वाखाणण्याजोगा असतो. वर्षभरही ही मुले वेगवेगळ्या कामात गुंग असतात. राख्या बनवणे, गोंड्याचे हार, कापडी फुल, फुलांच्या परड्या, बुके बनवणे अशा कामांमध्ये ही मुले वर्षाभर मग्न असतात.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  

संबंधित विषय
Advertisement