'आव्हान मतभेदांचे की मनभेदांचे'

 Dadar
'आव्हान मतभेदांचे की मनभेदांचे'

सानेगुरुजी यांच्या 67 व्या स्मृतिदिनानिमित्त साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक आणि राष्ट्रसेवा दल मुंबई यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी 'आव्हान मतभेदांचे की मनभेदांचे' या विषयावर भाष्य करणार आहेत.

त्याचबरोबर या कार्यक्रमात शआदत हसन मंटोंच्या कथांचे वाचन केले जाणार आहे. या कथांचे वाचन सादरीकरण डॉ. वसुधा सहस्त्रबुद्धे, धनश्री करमरकर, विशाल साळवे करणार आहेत. हा कार्यक्रम दादरच्या साने गुरुजी विद्यालय केटरिंग कॉलेजसमोर शनिवार 10 जून 2017 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या दिवसाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा दिवस निधी अर्पण दिन म्हणून पाळला जातो.

Loading Comments