'बाबूराव मस्तानी' चा खास प्रयोग

दादर - 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने मुंबईतल्या शिवाजी मंदिर येथे मंगळवारी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला 'बाबुराव मस्तानी ' या नाटकाचा मोफत शो ठेवण्यात आला होता. नाटकाच्या निर्मात्या चारुशीला ठोसर आणि निर्माते अनिल ठोसर यांनी खास महिलांसाठी हा शो आयोजित केला होता. महिला दिनानिमित्त राबवलेल्या या उपक्रमाला महिलांसोबत मुलींनी भरघोस प्रतिसाद दिला.

Loading Comments