कलागुणांनी परिपूर्ण 'टॅलेंट हंट 2017'

Matunga
कलागुणांनी परिपूर्ण 'टॅलेंट हंट 2017'
कलागुणांनी परिपूर्ण 'टॅलेंट हंट 2017'
कलागुणांनी परिपूर्ण 'टॅलेंट हंट 2017'
See all
मुंबई  -  

नाटक, नृत्य, गायन, स्टॅन्डअप कॉमेडी अशा अनेक कलांनी परिपूर्ण 'टॅलेंट हंट 2017' गुरुवारी 29 जून रोजी माटुंगा येथील मैसूर सभागृहात पार पडला. लहान मुलांतील छुप्या कलागुणांना संधी देत या टॅलेंट हंटद्वारे त्यांचे कलागुण सर्वांसमोर सादर करण्यात आले. यावेळी 'बेटी पढाओ बेटी बचाओ' या विषयावर स्पर्धकांनी नाटक सादर केले. 

जन्नत मीडिया प्रोडक्शनचे प्रमुख निझामुद्दीन शाह यांच्या संकल्पनेतून आणि जॉय केटरिंग सर्व्हिस यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  

जेथे कला हा विषय येतो तिथे नृत्य ही येणारच. अशाच नृत्य क्षेत्रात आपली छाप पाडणारा 'डान्स इंडिया डान्स लिटिल चॅम्प'च्या पहिल्या पर्वाचा विजेता जितू मोनी यावेळेस उपस्थित होता.

सिनेसृष्टीतील अभिनेत्री शिल्पा मेहता, स्क्रिन रायटर आणि फोटोग्राफर सोनी तारापूरवाला आदी मान्यवरांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी 'मुंबई लाइव्ह' हे मीडिया पार्टनर होते.

जन्नत मीडिया प्रोडक्शनतर्फे आयोजित या टॅलेंट हंट 2017 मध्ये सहभागी स्पर्धकांनी आपल्यातील उत्तम कलागुण सादर केले. यावेळी बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन स्पर्धकांचे कौतुक केले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.