SHARE

धारावी - आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या 'टेड एक्स' या ग्रुपच्या 'टेड एक्स धारावी' या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. धारावीच्या नेचर पार्कमध्ये सकाळी 11 ते संध्याकाळी सहा या वेळेत हा कार्यक्रम पार पडला. यात वक्ते आणि श्रोते मिळून 300 लोकांचा सहभाग होता. रघुवीर सुरुपा यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यामध्ये 18 मिनिटांत प्रत्येक व्यक्तीला धारावी काय आहे? या विषयी माहिती सांगणे बंधनकारक होते. त्यानुसार प्रत्येक तरुणाने आपल्या पद्धतीने धारावीविषयी त्याचं मत व्यक्त केलं. धारावीतील या तरुणांची प्रतिभा आणि त्यांच्या संकल्पनेचा प्रभाव भारतासह जागतिक स्तरावर पडेल अशी प्रतिक्रिया कार्यक्रमाचे आयोजक सुरुपा यांनी दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या