लेव्हल खाली पाडू नकोस हीना - शिव

बिग बॉस मराठीमध्ये टिकेल तोच टिकेल हा टास्क बिग बॉस यांनी सदस्यांवर सोपावला. टीम ए आणि टीम बी अशा दोन टीम्समध्ये हा टास्क रंगणार आहे.

  • लेव्हल खाली पाडू नकोस हीना - शिव
  • लेव्हल खाली पाडू नकोस हीना - शिव
SHARE

बिग बॉस मराठीमध्ये टिकेल तोच टिकेल हा टास्क बिग बॉस यांनी सदस्यांवर सोपावला. टीम ए आणि टीम बी अशा दोन टीम्समध्ये हा टास्क रंगणार आहे. काल सुरु झालेल्या या टास्कमध्ये सिंहासनावर बसलेल्या सदस्याला दुसऱ्या टीममधील सदस्यानं बजर वाजण्याच्या आत उठवायचं आहे. टास्कच्या सुरुवातीला शिव सिंहासनवर बसला आणि त्याचं संरक्षण रुपाली करणार असं शिवनं सांगितलं. आता या टास्कमध्ये कोणती टीम जिंकेल? हे बघणं रंजक असणार आहे. 


नियमांचं उल्लंघन

टिकेल तोच टिकेल या टास्कबरोबर नॉमिनेशन टास्कवरून देखील घरामध्ये किशोरी, पराग, रुपाली आणि वीणा शिववर नाराज होते. शिववर विश्वास ठेऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. अशातच वीणा आणि परागमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. आता टास्कमध्ये किशोरी शहाणे आणि पराग सिंहासनावर बसणार आहेत. यांच्याविरुध्द टीम पराग आणि किशोरी यांना सिंहासनावरून उठवण्यासाठी बरेच प्रयत्न करणार आहेत. प्रत्येक टास्कदरम्यान बिग बॉस घरातील सदस्यांकडून कित्येकदा अनाहुतपणं किंवा बऱ्याचदा जाणून बुजून नियमांचं उल्लंघन होत असतं. या टास्कमध्ये कोण आपल्या मर्यादा ओलांडतं ते पहायचं आहे.


शिवला राग अनावर 

टास्कमध्ये विजयी होण्यासाठी सदस्य कोणता मार्ग स्वीकारतील ? त्यासाठी काय काय करतील ? हे कळेलच. टास्क सुरु असताना हीना आणि शिवमध्ये बाचाबाची झाली. ज्यामध्ये शिव हीनाला म्हणाला की, लेव्हल खाली पाडू नकोस हीना. हिनानं असं काय केलं कि शिवला राग अनावर झाला? पराग आणि किशोरी यांनीदेखील संचालिका असलेल्या सुरेखा ताईना वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न केला कि बळाचा वापर होत आहे, असं नाही करू शकत तरीदेखील विरोधी टीम ऐकायला तयार नाही. त्यामुळं बिग बॉसच्या घरातील हा आठवडा आणि त्यात दिलेला नवीन टास्क या खेळाला कोणत्या थरापर्यंत घेऊन जाईल ते पहाणं रोमांचक ठरणार आहे.हेही वाचा -

मराठी गाणी गाताना अभिमान वाटतो – जावेद अली

EXCLUSIVE : झी टॅाकीजवर 'हजेरी' लावण्यासाठी मंगेशनं घेतलं उंदीर मारण्याचं ट्रेनिंग
संबंधित विषय
ताज्या बातम्या