मराठी गाणी गाताना अभिमान वाटतो – जावेद अली

हिंदीसोबतच भारतातील बऱ्याच प्रादेशिक भाषांमध्ये पार्श्वगायन करणाऱ्या जावेद अलीनं 'व्हॅाट्सअप लव' या मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं आहे. मराठीसाठी गायन करणं ही अभिमानाची गोष्ट असल्याचं जावेद मानतो.

  • मराठी गाणी गाताना अभिमान वाटतो – जावेद अली
SHARE

हिंदीसोबतच भारतातील बऱ्याच प्रादेशिक भाषांमध्ये पार्श्वगायन करणाऱ्या जावेद अलीनं 'व्हॅाट्सअप लव' या मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं आहे. मराठीसाठी गायन करणं ही अभिमानाची गोष्ट असल्याचं जावेद मानतो.


संगीत प्रकाशन सोहळा

'व्हॅाट्सअप लव' या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा गायक जावेद अलीच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याला चित्रपटाचे संगीतकार नितीन शंकर, लेखक-निर्माते-दिग्दर्शक हेमंतकुमार महाले, ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर सुरेश सुवर्णा, व्हिडीओ पॅलेसचे नानुभाई जयसिंघानी तसंच कलाकार-तंत्रज्ञ उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना जावेदनं आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. जावेद म्हणाला की, मी महाराष्ट्रात राहतो आणि मुंबई माझी कर्मभूमी आहे. मी जरी दिल्लीचा असलो तरी माझ्यासकट बहुतांश कलाकारांना मोठं करण्याचं काम महाराष्ट्रानं केलं आहे. त्यामुळं मराठी गाणी गाताना अभिमान वाटतो.


मंगेशकर कुटुंबाचा प्रभाव

भारतीय संगीत जगभर पोहोचवण्यात मराठी संगीतक्षेत्रातील मान्यवरांचा मोलाचा वाटा असल्याचं सांगत जावेद म्हणाला की, जगातील सर्वोत्तम गायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले यांची हिंदी आणि मराठी गाणी ऐकून मी मोठा झालो आहे. मंगेशकर कुटुंबाच्या संगीत साधनेचा माझ्यावर प्रभाव आहे. 'दयाघना...', व 'मेंदीच्या पानावर...' ही माझी आवडती मराठी गाणी आहेत. त्यामुळं मला जेव्हा जेव्हा मराठी गाणं गाण्यासाठी बोलावलं जातं तेव्हा मी खुश असतो. 


गाण्याचं कौशल्य

मराठी बोलता येत नसलं तरी मराठी गाणं मोठ्या खुबीनं गाण्याचं कौशल्य असणाऱ्या जावेदनं यामागील रहस्यही उलगडलं. तो म्हणाला की, जेव्हा मला मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन करण्यासाठी विचारलं जातं तेव्हा रेकॅार्डींगला जाण्यापूर्वी गीतातील संपूर्ण शब्दांचे शुद्ध उच्चार कसे होतील, याकडे लक्ष देतो. उच्चार नीट व्हावेत यासाठी सराव करतो. त्यासाठी मराठी गाणी आवर्जून ऐकतो. त्यामुळं रेकॉर्डींगनंतर मी जेव्हा ते गाणं ऐकतो तेव्हा आपणही मराठी गाणं उत्तमरीत्या गायल्याचा मला स्वत:लाच खूप अभिमान वाटतो. 


२ जुलै रोजी प्रदर्शित 

'व्हॅाट्सअप लव' या चित्रपटात जावेदनं 'शोना रे...' हे सोलो साँग आणि 'जवळ येना जरा...' हे श्रेया घोषाल सोबत ड्युएट गायलंय. याखेरीज या चित्रपटात आशा भोसले यांनीही एक गाणं गायलं आहे.संगीतकार नितीन शंकर यांनी या चित्रपटाला संगीत दिलं असून, अजीता काळे यांनी गीतरचना केली आहे. या चित्रपटात राकेश बापट, अनुजा साठे, पर्शियन अभिनेत्री सारेह फर, पल्लवी शेट्टी, अनुप चौधरी, अनुराधा राजाध्यक्ष आदि कलाकारांनी अभिनय केला आहे. ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर सुरेश सुवर्णा यांनी या चित्रपटाची सुरेख सिनेमॅटोग्राफी केली आहे. १२ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा  -

पूर्वीच्या ‘अंतर्नाद’मधील ‘भज गणपती’

आठ वर्षांनी संजय-अजय पुन्हा एकत्रसंबंधित विषय
ताज्या बातम्या