Advertisement

पूर्वीच्या ‘अंतर्नाद’मधील ‘भज गणपती’

अभिनयाइतकीच नृत्यातही पारंगत असलेल्या अभिनेत्री पूर्वी भावेनं नेहमीच आपल्या कलागुणांनी प्रभावित केलं आहे. पूर्वीच्या नृत्यानं सजलेल्या ‘अंतर्नाद’ सिरीजमधील ‘भज गणपती…’ हे गाणं आता रसिकांच्या भेटीला आलं आहे.

पूर्वीच्या ‘अंतर्नाद’मधील ‘भज गणपती’
SHARES

अभिनयाइतकीच नृत्यातही पारंगत असलेल्या अभिनेत्री पूर्वी भावेनं नेहमीच आपल्या कलागुणांनी प्रभावित केलं आहे. पूर्वीच्या नृत्यानं सजलेल्या ‘अंतर्नाद’ सिरीजमधील ‘भज गणपती…’ हे गाणं आता रसिकांच्या भेटीला आलं आहे.


डान्स सीरिज

कधी अभिनय, कधी नृत्य, तर कधी सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत भेटणारी पूर्वी भावे एक नवीन डान्स सीरिज घेऊन आली आहे. या सिरीजचं शीर्षक आहे ‘अंतर्नाद’. या सिरीजमधील ‘भज गणपती…’ हे भक्तीरसानं ओतप्रोत भरलेलं भरतानाट्यम नृत्यशैलीत सादर करण्यात आलेलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. 'भज गणपती…' हे गाणं पूर्वीच्या आई प्रसिध्द शास्त्रीय गायिका वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलं आहे. हे या गाण्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य मानलं जात आहे.


भरतनाट्यम शैलीतील गाणं

‘अंतर्नाद’मधील पहिल्या गाण्याबाबत आपल्या भावना व्यक्त करताना पूर्वी म्हणाली की, कोणत्याही शुभकार्याची सुरूवात आपण गणेश आरधनेनं आणि वंदनेनं करतो. त्यामुळं या सीरिजची सुरूवातही श्रीगणेशाची स्तुती वर्णन करणाऱ्या ‘भज गणपती…’ या गाण्यानं करण्यात आली आहे. लहानपणापासून मी भरतनाट्यम शिकत आहे. त्यामुळं ही सीरिज सुरू करताना पहिलं गाणं भरतनाट्यम शैलीतील असावं असं मला वाटलं. आईनं माझ्या मनातील इच्छा पूर्ण करत हे गाणं संगीतबद्ध केलं. या सिरीजमधील पुढील गाण्यामधून रसिकांना वेगवेगळ्या नृत्यशैली पाहायला मिळतील.


 गुंदेश्वर मंदिरात चित्रीत 

पूर्वीवर चित्रीत करण्यात आलेलं ‘भज गणपती…’ हे गाणं सिन्नरमधील गुंदेश्वर मंदिरात चित्रीत करण्यात आलं आहे. या गाण्याच्या नेत्रसुखद चित्रीकरणाबाबत पूर्वी म्हणाली की, आम्ही या गाण्याचं चित्रीकरण मे महिन्यात केलं आहे. त्या वेळी या मंदिराच्या परिसरातील जमीन एवढी तापायची की, अनवाणी चालणंही कठीण व्हायचं. तिथली जमीनही ओबडधोबड होती. त्यामुळं डान्स करणंही खूप कठीण जात होतं, पण आम्हाला खूप कमी वेळाची परवानगी मिळाल्यामुळं हे आव्हानही स्विकारावं लागलं. वेळेच्या अभावामुळं बरेच शॉट्स वेन-टेक चित्रीत झाले आहेत. त्यावेळी उद्भवलेल्या परिस्थितीचा आणि आव्हानांचा सामना धीरोदात्तपणे केल्यानंच आता हे गाणं पाहताना सुरेख वाटत आहे.


 लिंक - https://www.youtube.com/watch?v=qSQGlRC_PbY&feature=youtu.be

हेही वाचा  -

अभिजीत बिचुकले बिग बाॅसच्या घरात परतणार?

EXCLUSIVE : मेघासोबत बरसणार अनंत अंकुषचा 'पहिला पाऊस'




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा