आठ वर्षांनी संजय-अजय पुन्हा एकत्र

अभिनेता संजय दत्त आणि अजय देवगण पुन्हा एकदा एकाच चित्रपटात झळकणार आहेत. या दोघांची मुख्य भूमिका असलेल्या आगामी हिंदी चित्रपटाचं शूट सुरू झालं आहे.

  • आठ वर्षांनी संजय-अजय पुन्हा एकत्र
  • आठ वर्षांनी संजय-अजय पुन्हा एकत्र
SHARE

अभिनेता संजय दत्त आणि अजय देवगण पुन्हा एकदा एकाच चित्रपटात झळकणार आहेत. या दोघांची मुख्य भूमिका असलेल्या आगामी हिंदी चित्रपटाचं शूट सुरू झालं आहे.


भुज - द प्राईड आॅफ इंडिया

चित्रपटसृष्टीतील काही अभिनेते बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र दिसत असतात. संजय दत्त आणि अजय देवगण यांनीही आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र अभिनय केला आहे. इतकंच नव्हे तर एकत्र पाहुण्या कलाकारांची भूमिकाही साकारली आहे. आता 'भुज - द प्राईड आॅफ इंडिया' या आगामी हिंदी चित्रपटासाठी संजय-अजय पुन्हा एकत्र आले आहेत. हैदराबादमधील प्रसिद्ध रामोजी फिल्म सिटीमध्ये 'भुज - द प्राईड आॅफ इंडिया'च्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे. पुढल्या वर्षी १४ आॅगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात आली आहे.


युद्धाची पार्श्वभूमी

अभिषेक दुधैया यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटात संजय-अजय यांच्या जोडीला सोनाक्षी सिन्हा, परीणिती चोप्रा, राणा दग्गुबती, अॅमी विर्क आदी कलाकार आहेत. या चित्रपटाचं लेखनही अभिषेक यांनीच केलं आहे. या चित्रपटाला १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धाची पार्श्वभूमी असल्याचं समजतं. या चित्रपटात आयएएफ स्क्वॅार्डन लीडर विजय कर्णिक यांनी गुजरातमधील माधापूर येथे गाजवलेल्या पराक्रमाची आणि भुजजवळील गावातील ३०० गावकरी स्त्रीयांच्या शौर्याची गाथा पहायला मिळेल असं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समजतं.


१२ वेळा एकत्र काम

'भुज - द प्राईड आॅफ इंडिया' या चित्रपटापूर्वी संजय-अजय जवळजवळ १२ वेळा एकत्र काम केलं आहे. खरं तर संजय-अजय यांचा चित्रपटांमध्ये एकत्र येण्याचा प्रवास २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'राजू चाचा' या चित्रपटापासून सुरू झाला. अजय-काजोल यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात संजयनं पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर 'हम किसीसे कम नही', 'एलओसी कारगिल', 'टँगो चार्ली', 'मेहबूबा', 'आॅल दी बेस्ट', 'मि. फ्रॅाड', 'टूनपूर का सुपरहिरो', 'रास्कल्स', 'रेडी' आणि त्यानंतर २०१२ मध्ये आलेल्या 'सन आॅफ सरदार' या चित्रपटांमध्ये संजय-अजय एकत्र आले होते. आता जवळजवळ आठ वर्षांनी 'भुज - द प्राईड आॅफ इंडिया'मध्ये दोघे पुन्हा एकत्र दिसणार आहेत.हेही वाचा  -

अभिजीत बिचुकले बिग बाॅसच्या घरात परतणार?

EXCLUSIVE : मेघासोबत बरसणार अनंत अंकुषचा 'पहिला पाऊस'
संबंधित विषय
ताज्या बातम्या