आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

 Mumbai
आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई - अप्पर पोलीस महासंचालकांतर्फे सोमवारी दोन आयपीएस अधिकाऱ्यांची पदोन्नतीसह बदली करण्यात आली. त्यातील महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 च्या कलम 22 तरतुदीनुसार विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. त्यातील धंनजय कमलाकर (भापोसे) हे सध्या सागरी सुरक्षा आणि विशेष सरंक्षण या विभागत विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची बदली ही त्याच विभागात अप्पर पोलीस महासंचालकपदी झाली आहे. तसेच आधी गुन्हे अन्वेषण विभाग, राज्य गुन्हे अभिलेख केंद्र, पुणे येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले संजीव सिंघल यांची देखील त्याच विभागात अप्पर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Loading Comments