Advertisement

घाटकोपरमध्ये वॅक्स म्युझियम


घाटकोपरमध्ये वॅक्स म्युझियम
SHARES

घाटकोपर - वॅक्स म्युझियम म्हटलं की, आपल्यासमोर लंडनचे मादाम तुसाँ आणि लोणावळ्यातील वॅक्स म्युझियम उभं राहतं. पण आता मुंबईतच सेलिब्रिटींच्या मेणाचे पुतळे पाहण्याची संधी मुंबईकरांना शनिवारपासून उपलब्ध झालीय. वॅक्स म्युझियम रेड कार्पेटनं ही संधी उपलब्ध करून दिलीय.

घाटकोपर इथं आर सिटी मॉलमध्ये हे म्युझियम सुरू करण्यात आलंय. बाळासाहेब ठाकरे यांच्या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण या वेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. रेड कार्पेटच्या या उपक्रमाचं उद्धव ठाकरेंनी भरभरून कौतुकही केलं.

या म्युझियममध्ये मदर टेरेसा, महात्मा गांधी, दलाई लामा, पोप, पी. व्ही. सिंधू अशा अनेक भारतीय व्यक्तींसोबतच बराक ओबामा, मायकल जॅक्शन, आइनस्टाइन, एंजलिना जोली, ब्रॅड पिट, जेम्स बाँड, नेल्सन मंडेला, स्टीव्ह जॉब, हॅरी पॉटर, आणि जॉन सिना आशा हॉलिवूड, सामाजिक, वैज्ञानिक आणि समाजसेवक या सर्वांच्या मणाचे पुतळे इथं पाहायला मिळतील. या म्युझियममधील मेणाचे पुतळे पाहण्यासाठी लहान मुलांना 350 रुपये आणि प्रौढांना 450 रुपये मोजावे लागणार आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा