पोलीस वसाहतीत महिला दिन साजरा

 MAHIM
पोलीस वसाहतीत महिला दिन साजरा

माहिम - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोहिनूर टेक्नीकल इंस्टिट्यूटच्या वतीने माहिमच्या पोलीस वसाहतीतील समाज मंदिर सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिलांसाठी भरतकामाची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यक्रमात महिला स्वावलंबी असणे किती महत्त्वाचे आहे, या विषयावर कोहिनूर टेक्नीकल इंस्टिट्यूटच्या बिझनेस हेड छाया खेडेकर यांनी मार्गदर्शन केले. या पोलीस वसाहतीत राहणाऱ्या महिला पोलीस आणि पोलीस पत्नींना शुभेच्छा देण्यासाठी माहिम पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद इडेकर यांनी उपस्थिती दर्शवून महिलांना शुभेच्छा दिल्या.

महिला दिनाचं औचित्य साधून कोहिनूरच्या देशभरातल्या 15 शाखांमध्ये अशा विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती छाया खेडेकर यांनी या वेळी दिली. जगभरातल्या कर्तृत्ववान महिलांचे दाखले देत त्यांनी इच्छाशक्ती ठेवाल तर कामात कसलाही अडथळा येणार नाही असा सल्लाही उपस्थित महिलांना दिला.

Loading Comments