वर्ल्ड बॅंकेच्या सीईओची धारावीच्या शाळेला भेट

धारावी - वर्ल्ड बॅंकेच्या सीईओ क्रिस्टैलिना जॉर्जिया यांनी महात्मा गांधी रोडवर असलेल्या महापालिकेच्या (धारावी ट्रान्झिस्ट कॅम्प शाळा) संकुलला भेट दिली. 

या वेळी भारतातल्या शाळांमध्ये ही एकमेव शाळा वर्ल्ड बॅंकच्या सीइओ यांनी भेटीसाठी निवडली होती. 

धारावी ही आशिया खंडातील महत्त्वाच्या आणि मोठ्या झोपडपट्यांपैकी एक असल्यामुळे या ठिकाणी अनेक समस्या आहेत. परंतु शिक्षणासंदर्भातील समस्या जाणून घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उत्तम शिक्षणासाठी वर्ल्ड बॅंकच्या वतीने काही मदत केली जाणार आहे. याकरता प्राथमिक सुविधा शाळेमध्ये काय आहेत? या शाळेत कोणकोणते वेगवेगळे उपक्रम चालवले जातात? शाळेच्या शिक्षणाचा दर्जा कसा आहे? शिक्षण गुणवत्ता पूर्ण आहे का? याची माहिती क्रिस्टैलिना जॉर्जिया यांनी घेतली. शालेय शिक्षणातून विद्यार्थ्यांना रोजगार निर्मिती कशी होईल? त्यासाठी अर्थिक मदतीची आवश्यकता आहे का? याची देखील पाहणी करण्यात आली.

Loading Comments