Advertisement

स्पर्धेच्या युगात तरुणांनी जागरूक राहावे


स्पर्धेच्या युगात तरुणांनी जागरूक राहावे
SHARES

तरूण पिढीने आजच्या स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्व विकास तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमाबाबत अत्यंत जागरूक रहाणे गरजेचे आहे. आपल्याला साजेशा क्षेत्रात करिअर करण्यासाठी अचूक अभ्यासक्रम निवडल्यास भविष्यातील वाटचाल सोपी होऊ शकते, असा सल्ला पोलीस उप आयुक्त एन. अंबिका यांनी तरूणांना दिला. त्या वडाळ्यातील करिअर मार्गदर्शन शिबिरात बोलत होत्या.

वडाळा पूर्वेकडील विद्यालंकार इंजिनीअरिंग महाविद्यालयात वडाळा व अॅन्टॉप हिल हद्दीतील 16 ते 20 वर्षे वयोगटातील तरुण, तरुणींसाठी बुधवारी 'करिअर मार्गदर्शन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जवळपास 250 तरूण, तरूणी सहभागी झाले होते. पोलीस उप आयुक्त परिमंडळ 4, मुंबई, वडाळा टी. टी पोलीस ठाणे, अॅन्टॉप हिल पोलीस ठाणे आणि डॉन बॉस्को डेव्हलपमेंट सेंटर यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

झोपडपट्टी व बैठ्या चाळीत राहणाऱ्या मुलांना शिक्षण व व्यवसायविषयक मार्गदर्शन सहजतेने मिळत नाही. त्यामुळे त्यांना मार्गदर्शन देण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अंबिका पुढे म्हणाल्या की, जास्तीत जास्त तरुण, तरुणींना या उपक्रमाचा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे यापुढेही नियमितपणे आयोजन करण्यात येणार आहे.

यावेळी डॉन बॉस्को डेव्हलपमेंट सेंटरचे अजय नाईक आणि शोभा पेडणेकर यांनी उपस्थितांना शिक्षणाचे महत्व, मोटिव्हेशन, 12 वी तसेच पदवी शिक्षणानंतर करावयाचे कोर्सेस याबाबत माहिती  दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा