युवा अस्तित्व प्रतिष्ठानचा वर्धापनदिन साजरा


SHARE

शिवडी - शिवडी पश्चिम इथल्या युवा अस्तित्व प्रतिष्ठानचा सातवा वर्धापन दिन सोहळा रविवारी प्रबोधनकार शाळेच्या सभागृहात झाला. युवा अस्तित्व प्रतिष्ठान कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून वर्षभर विविध उपक्रम राबवून सामाजिक संदेश देण्याचे काम करते.

यंदा प्रतिष्ठानला 7 वर्षे पूर्ण झाली असून यानिमित्त सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर विभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत स्मार्ट कार्ड वाटप देखील करण्यात आलं असून याचा शंभरहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. दरम्यान, वर्धापनदिनानिमित्त युवा अस्तित्व प्रतिष्ठानच्या कामकाजाचा आढावा सांगणाऱ्या स्मरणिकाचं प्रकाशन शिवडीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विजय इंदुलकर यांच्या हस्ते करण्यात आलं. या वेळी शेखर मोकल, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन मोहिते, सचिव विठ्ठल धुमक, खजिनदार राकेश गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या