Advertisement

कांदिवलीत 'युवोत्सव 2017'


कांदिवलीत 'युवोत्सव 2017'
SHARES

कांदिवली - उत्तर मुंबई अभाविपच्या वतीने आयोजित केलेला दोन दिवसीय 'युवोत्सव 2017 'मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात व्हॉलिबॉल, रिंक फुटबॉल, बॉक्स क्रिकेट आणि कबड्डी सामन्यांचं आयोजन करण्यात आलं. कांदिवलीच्या पोयसर जिमखान्यात या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. 30 कॉलेजचे जवळपास 450 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. महोत्सवाचं उद्घाटन मुंबई अभाविपचे महानगर सचिव रोहीत चंदोडे यांनी केलं. महोत्सवाचं संचालन कॉलेज कॅम्पस हेड आशीष देशपांडे यांनी केलं. कार्यक्रमाचं मार्गदर्शन मुख्याध्यापक उमेश शर्मा यांनी केलं. प्रणाली नाईक यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. अभाविपचे कोकण प्रदेश सचिव प्रमोद करड यांनी महोत्सवात सहभागी झालेल्या नागरिकांना सन्मानित केलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा