मराठी अस्मितेचा ‘आमोद’

  CST
  मराठी अस्मितेचा ‘आमोद’
  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव
  मुंबई  -  

  मुंबई - 1923 साली स्थापन झालेल्या, 93 वर्षांची मराठी संस्कृती जोपासण्याची परंपरा लाभलेल्या संत झेवियर्स महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाचा वार्षिक महोत्सव ‘आमोद’ या वर्षी देखील विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन आणि व्यासपीठ देण्यासाठी आयोजित केलायं. हा मराठी अस्मितेचा उत्सव 19, 20, 21 जानेवारीला झेवियर्स महाविद्यालयामध्ये पार पडणार आहे. आमोद हा सोहळा आंतर महाविद्यालयीन मराठी साहित्य, नृत्य, संगीत आणि ललित कला स्पर्धांचा सोहळा आहे. संत झेवियर्स महाविद्यालयाचं मराठी वाङ्मय मंडळ हे दर महिन्यामध्ये काहीना काही कार्यक्रम आणि उपक्रम करत असतं. या वर्षी देखील अंतरंग - गोष्ट तुमची आमची, क्लिक उत्सव ही छायाचित्र स्पर्धा आणि तेजोमय या दिवाळी अंकाचे प्रकाशन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. अशीच कार्यक्रमाची विविधता हे मंडळ आमोद्च्या निमित्ताने आणत आहे. 21 जानेवारीला पारितोषिक वितरण समारंभ होईल. तसेच या दिवसांमध्ये मराठी वाङ्मय मंडळाचा वार्षिक अंक ‘पखरण’ चं देखील प्रकाशन करण्यात येईल.

  आमोदमध्ये मराठी भाषेतील 10 स्पर्धा पार पडतील

  19 जानेवारी 2017

  • ब. न. पुरंदरे वक्तृत्व स्पर्धा
  • पोस्टरबाजी - पोस्टर मेकिंग स्पर्धा
  • सूर संगम - संगीत मिश्रण (फ्यूजन) स्पर्धा
  • बहुरूपी ही एकपात्री अभिनय स्पर्धा 

  20 जानेवारी 2017

  • स्वरक्षेत्र - संगीत जुगलबंदी स्पर्धा
  • फू बाई फू - विनोदी नाट्य स्पर्धा
  • कार्टून फॅक्टरी - कॉमिक रिले स्पर्धा ( हास्य ललित कला)
  • चार ओळींची गोष्ट - साहित्य स्पर्धा (गोष्ट फक्त चार ओळीत )

  21 जानेवारी 2017

  • महाराष्ट्राची लोकधारा - लोकनृत्य स्पर्धा
  • काव्य नाटुकली - काव्यचे नाटकात सादरीकरण स्पर्धा
  Loading Comments
  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.