वरळीत साईनामाचा गजर

वरळी - वरळीतल्या जांबोरी मैदानात शनिवारचा दिवस उजडला तो साईनामानंच. निमित्त होतं साईबाबा महासमाधी शताब्दी वर्ष संमेलनाचं. सर्वधर्मियांची श्रध्दा असलेल्या साईबाबांना वंदन करण्यासाठी भाविकांनी जांबोरी मैदानात गर्दी केली होती.

सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. होम प्रज्वलित झाल्याने पवित्र झालेल्या वातावरणात 101 जोडप्यांकडून महाभिषेक करण्यात आला. दुपारच्या महाआरतीला महापौर स्नेहल आंबेकर, सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे, शिर्डी संस्थांचे सुरेश हावरे आदींची उपस्थिती होती. मंडळाचे अध्यक्ष सच्चिदानंद अप्पा यांच्या हस्ते करण्यात आली. महाआरती नंतर साईपारायण झाले.

संध्याकाळी सिध्दीविनायक मंदिरापासून निघालेली पालखी वरळीत संमेलनास्थळी दाखल झाली. उत्साह आणि भक्तिभावानं या पालखीचं स्वागत करण्यात आलं.  नंतर सचिन अहिर यांच्या हस्ते संध्याकाळची आरती झाली. अवघा परिसर भक्तिमय करून टाकणारा हा साईसोहळा रविवारीही सुरू राहणार आहे. या संमेलनाविषयी अधिक माहितीसाठी www.shreesaibhaktamandal.com या संकेतस्थळाला भेट द्या.

Loading Comments