Advertisement

असामान्यांचा अनोखा संदेश


असामान्यांचा अनोखा संदेश
SHARES

दादर - महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आजही दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. त्यामुळे 'पाण्याचा अपव्यय टाळा, पाणी वाचवा'चा संदेश देण्यासाठी दादरमधील श्रीमती कमला मेहता अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी शाळेच्या आवारात नैसर्गिक रंग उधळत मोठ्या उत्साहात पाण्याविना रंगपंचमी साजरी केली.

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी शाळेमध्ये वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर सामाजिक कार्याची जाणीव होते असे शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा जाधव यांनी सांगितलं.

सर्व सामान्यांनाही असामान्य वाटणाऱ्या या विद्यार्थ्यांनी पाण्याविना रंगपंचमी साजरी करून समाजाला एक वेगळा संदेश दिला आहे. यावेळी विद्यार्थ्यांवर रंगाचे कोणतेही दुष्परिणाम होऊ नयेत यासाठी नैसर्गिक रंगही वापरण्यात आले होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा