भांडुपमध्ये कोकण महोत्सव

 Kandivali
भांडुपमध्ये कोकण महोत्सव

कोकणनगर - भांडुप पश्चिमेकडील कोकणनगर परिसरातल्या महापालिका मैदानावर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ४ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत कोकण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. उत्सव परिवार आणि श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीनं १९ वर्षांपासून हा महोत्सव भरवण्यात येतो. कोकणातील मेवा, खाद्यपदार्थ आणि विविध उत्पादनांसह, दशावतारी नाटकं आणि सांस्कृतिक ठेवा भांडुपकरांना या कोकण महोत्सवादरम्यान बघायला मिळतो. तरी या वर्षीही मोठ्या प्रमाणात कोकणातील उद्योजक, छोटे-मोठे व्यावसायिक, तसेच हाैशी कलाकार आणि भांडुपकरांनी या महोत्सवाला उपस्थिती लावावी, असं आवाहन महोत्सवाचे आयोजक सुजय धुरत यांंनी केलंय.

Loading Comments