Advertisement

वंचित बालकांसाठी वोकहार्ट रुग्णालय बनलं सांताक्लॉज


वंचित बालकांसाठी वोकहार्ट रुग्णालय बनलं सांताक्लॉज
SHARES

ख्रिसमस म्हटलं की लहान मुलांना सांताक्लॉज आणि विविध भेटवस्तूंचं आकर्षण असतं. मात्र आर्थिक परिस्थितीमुळं काही मुलांना या गोष्टीचा आनंद घेता येत नाही. या वंचित मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांताक्लॉज बनत या लहान मुलांना शालेय साहित्याचं व नवीन कपड्यांचं वाटप केलं. 


विविध स्पर्धाचं आयोजन 

गेल्या पाच वर्षापासून वोकहार्ट रूग्णालय अशा प्रकारचे अनेक उपक्रम राबवत आहेत. यंदा ख्रिसमसच्या निमित्तानं अनेक लहान व गरजू मुलांना शालेय साहित्याचं व नवीन कपड्यांचं वाटप करण्यात आलं. त्याशिवाय त्यांच्यासोबत मनोरंजनात्मक खेळ, अंताक्षरी अादी विविध स्पर्धाचंही आयोजन करण्यात आलं. या उपक्रमात अनेक वंचित मुलांनी सहभाग घेतला होता.  या कार्यक्रमानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद पाहायला मिळत होता. या कार्यक्रमात मुंबई सेंट्रल येथील वोकहार्टच रुग्णालयाचे प्रमुख डॉ. पराग रिदानीसह रुग्णालयातील अनेक कर्मचारी देखील सहभागी झाले होते.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा