Advertisement

Navratri 2020: कोरोनामुळं नवरात्रीत व्यवसाय करण्याऱ्यांवर आर्थिक संकट

या नवरोत्रोत्सवात व्यवसाय करणाऱ्यांवर म्हणजे चनिया चोली, दांडिया, मिठाई, गोंधळी आणि वाद्यवृदांवर आर्थिक संकट ओढावलं आहे.

Navratri 2020: कोरोनामुळं नवरात्रीत व्यवसाय करण्याऱ्यांवर आर्थिक संकट
SHARES

दरवर्षी नवरात्रोत्सवात (navratri) गरबा, दांडिया-रास कार्यक्रमांचं आयोजन केलं जात. गुजराती गाण्यांच्या ठेक्यावर थिरकण्यासाठी मोठ्या प्रमाणात गरबा रसिक मैदानात गर्दी करातात. मात्र, गणेशोत्सवाप्रमाणं नवरात्रोत्सावावरही कोरोनाचं सावट असल्यानं साधेपणानं नवरात्रोत्साव साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारनं (state government) केलं आहे. परिणामी या नवरोत्रोत्सवात व्यवसाय करणाऱ्यांवर म्हणजे चनिया चोली, दांडिया, मिठाई, गोंधळी आणि वाद्यवृदांवर आर्थिक संकट ओढावलं आहे.

दरवर्षी गुजराती गाण्यांच्या ठेक्यावर थिरकायला लावणाऱ्या गायक तसंच संगीतकारांची मोछी गर्दी पाहायला मिळते. मात्र, यंदा कोरोनामुळं राज्य शासनानं गरबा (garba) तसंच दांडिया (dandiya) आयोजित करण्यास मनाई केली आहे. ऑनलाइन सांगीतिक कार्यक्रमांना पुरेसा प्रेक्षकवर्ग आणि प्रयोजकत्व मिळत नसल्यानं छोटे-मोठे वाद्यवृदं अशा पद्धतीचं कार्यक्रम करत आहेत.

नवरात्रोत्सवानिमित्त मुंबईसह आसपासच्या परिसरात छोटे-मोठे ऑर्केस्ट्रा समूह असून ते नवरात्रीत सांगीतिक कार्यक्रम करतात. मात्र, यंदा कोरोनामुळं (corona) महत्त्वाच्या सण समारंभाला वाजवण्यास मनाई असल्यानं संगीतकार व व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनामुळं लोकांच्या एकत्रित जमण्यास मर्यादा आल्यानं सांगीतिक कार्यक्रम ऑनलाइन होत आहेत.

सर्वाधिक कमाई

संगितकार व वादकांची नवरात्रीच्या ९ दिवसांत सर्वाधिक कमाई होते. मात्र, यंदा कोरोनामुळे नवरात्रीत गरबा, दांडिया, गणेशोत्सव साधेपणानं व मोठे सोहळे होत नसल्यानं ७ महिन्यांत उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनामुळे उत्पन्नाचं साधन बंद असल्यानं गायक आणि संगीतकारांवर बिकट परिस्थिती ओढवली आहे.

चनिया चोली व दांडिया

गरब्याचं आयोजन नसल्यानं चनिया चोली व इतर फॅन्सी कपड्यांच्या दुकानात ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. नवरात्रीत चनिया चोली व दांडियांना प्राधान्या दिलं जात. परंतू, यंदा सर्वच कार्यक्रम रद्द केल्यानं यांच्या व्यवसायावर पाणी फिरलं आहे.


मिठाईची दुकानं

मिठाईच्या दुकानांमध्येही ग्राहकांनी १ किलो ऐवजी १०० ग्रॅम मिठाई खरेदी करणं पसंत केलं आहे. कारण यंदा मंदिर बंद असल्यानं मिठाई ठेवण्यास व हार घालण्यास मनाई आहे. त्यामुळं यांनाही मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. 
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा