बेकायदा फटाके विक्रेत्यांना बसणार चाप

  Pali Hill
  बेकायदा फटाके विक्रेत्यांना बसणार चाप
  मुंबई  -  

  मुंबई - दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांची बेकायदा विक्री करणाऱ्यांना चांगलाच चाप बसणार आहे. अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक वॉर्डात समिती स्थापन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मंगळवारी दिले अाहेत. फटाक्यांच्या बेकायदा दुकानांना आग लागून होणारे अपघात टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं उपाययोजना सुचवली आहे. फटाक्यांच्या विरोधात चंद्रकांत लासुरे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर मुंबई उच्च न्यायालयानं हे अादेश दिले.

  राज्यातील सर्व पालिकांनी बेकायदा फटाके विक्रीवर कारवाई करावी असंही न्यायालयानं या वेळी सांगितलं. फटाक्यांमुळे ध्वनि प्रदूषणाच्या समस्येत वाढ होत असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं आहे. काही वर्षांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये फटाके वाजवण्याचं प्रमाण कमी झालं आहे. शाळेतून जनजागृती केली जात असल्यामुळं हे प्रमाण कमी होत आहे, अशीच जनजागृती सर्वत्र केली पाहिजे, अशा शब्दांत न्यायालयानं मुंबईचे कौतुक केलं हाेतं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.