Advertisement

महाकाली मंदिरात नवरात्रोत्सवाची धूम


महाकाली मंदिरात नवरात्रोत्सवाची धूम
SHARES

चेंबूर - जय अंबे मित्र मंडळाच्यावतीने अयोध्यानगर वाशीनाका येथील महाकाली माता मंदिरात नवरोत्रोत्सव मोठ्या धुमधड्याक्यात साजरा केला जात असून गरब्याचेही आयोजन करण्यात आले आहे. या मंदिराची स्थापना १९५० साली छोट्या मंदिराच्या स्वरुपात करण्यात आली. त्यावेळी सिन्हा नावाचे पुजारी या मंदिराची देखभाल आणि पूजा अर्चना करत होते. त्यानंतर स्थानिक रहिवाशी बाबुभाई मेस्त्री, नामदेव चौगुले, के राजाराम, अरविंद जुवाटकर, तुकाराम तिलके यांनी लोक वर्गणीतून १९८० साली या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला. सध्या मितीला तरूण मित्र मंडळी या मंदिराचा सर्व कारभार पाहत आहेत. दरवर्षी नवरात्रोत्सवात लांबचा अंतर गाठून अनेक भक्तमंडळी देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. इथे दसऱ्याला बकऱ्याचा बळी देण्याची प्रथा आहे. विशेष म्हणजे या मंदिरात मुस्लीम बांधव मोहरमच्या आदल्या दिवशी श्रीफळ चढवतात.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा