Advertisement

वाचा, बलिप्रतिपदा आणि बळी राजाची कहाणी!


वाचा, बलिप्रतिपदा आणि बळी राजाची कहाणी!
SHARES

आश्विन मास संपल्यानंतर कार्तिक महिन्याच्या प्रतिपदेला दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदा म्हणतात. भारतीय परंपरेत या दिवसाला शुभ मानले जाते. गुढीपाडवा, दसरा त्यानंतर दिवाळीचा पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानतात. या दिवशी व्यापारी आपल्या नवीन कामाची सुरुवात करतात. व्यापारी वर्गाच्या आर्थिक वर्षाची सुरुवात याच दिवसापासून करतात.


बलिप्रतिपदा म्हणजे काय?

या दिवशी बळीराजाची पूजा करण्याची प्रथा आहे. बळीराजा हा केरळचा प्रसिद्ध राजा होता. तो अत्यंत दानशूर होता. विष्णूदेवतेने वामनाचे रुप घेत त्याच्याकडून तीन पावले जमिनीची मागणी केली. बळीराजाने वामनाची मागणी मान्य केल्यावर वामनाने त्याला पाताळात ढकलले. पण त्याचवेळी त्याच्या दानशूरतेमुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने बळीला वरदान दिले की, बलिप्रतिपदेला लोक तुझे स्मरण करतील. तेव्हापासून दिवाळीत बलिप्रतिपदेला बळीराजाचे नामस्मरण करून पूजाविधी करण्याची प्रथा आहे.


शालिवहन शकाची सुरुवात

महाराष्ट्रात पाडव्याच्या दिवशी शालिवाहन शकाची सुरुवात होते. या दिवशी विक्रम संवत्सराची देखील सुरुवात होते. राजा विक्रमादित्य याच्या नावाने कालगणना करायला याच दिवसापासून सुरुवात होते असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी व्यापारी वर्गात नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात.

या दिवशी गोवर्धनाची देखील पूजा केली जाते. अशी अख्यायिका आहे की, गोकुळवासी दरवर्षी इंद्राची पूजा करत असत. पण त्या गावात असलेला गोवर्धन पर्वत हा महत्त्वाचा असल्याने तिथल्या जनतेने त्याची पूजा करायला हवी, असे कृष्णाने तिथल्या जनतेला सांगितले. त्यानुसार तिथल्या जनतेने कृष्णाचे म्हणणे मान्य केले. त्यामुळे इंद्र चिडला आणि त्याने जोरदार पाऊस पाडायला सुरुवात केली. त्यामुळे तेथील घाबरलेली जनता कृष्णाकडे गेली. त्यानंतर कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गोकुळवासियांना त्यात आश्रय देत त्यांची रक्षा केली. त्यामुळे दरवर्षी दिवाळीच्या बलिप्रतिपदेला गोवर्धनाची पूजा करण्याची प्रथा आहे.



हेही वाचा - 

दिवाळीत का करतात लक्ष्मीपूजा?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा