Advertisement

दिवाळीत का करतात लक्ष्मीपूजा?


दिवाळीत का करतात लक्ष्मीपूजा?
SHARES

अश्विन महिन्यात येणाऱ्या अमवस्येला आणि नरकचतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी भारतात लक्ष्मीपूजा करण्याची प्रथा आहे. खरेतर भारतीय संस्कृतीममध्ये आमवस्येला अशुभ मानले जाते. पण काही आमवस्या महत्त्वाच्या असतात. नरकचतुर्दशीप्रमाणे या दिवशी देखील अभ्यंगस्नान केले जाते.



या दिवशी ग्रामीण भागापासून ते शहरात सगळीकडेच दिवसभर आवराआवर असते. खऱ्या अर्थाने सर्वजण दिवाळीच्या या दिवसाची आवर्जून वाट पाहात असतात. सकाळी आणि संध्याकाळी अंगण किंवा दारासमोर भलीमोठी सुरेख रांगोळी काढली जाते. संध्याकाळ होताच दिव्यांची आरास आणि रोषणाईने संपूर्ण घर आणि परिसर उजळून निघतो. हे आपण सर्वांनाच माहीत आहे. पण लक्ष्मी आणि कुबेराची पूजा का केली जाते?



का करतात लक्ष्मी पूजा?

पौराणिक कथेनुसार, दिवाळीमध्ये येणाऱ्या लक्ष्मीपूजनाच्या रात्री लक्ष्मी पृथ्वीवर संचार करत असते. आपण कुठे वास्तव्य करायचे? याच्या शोधात असते. जिथे प्रसन्न वातावरण स्वच्छता, प्रामाणिक आणि गुणी माणसे राहतात, तिथे ती वास्तव्याला जाते. त्यामुळेच दिवाळीला साफसफाई, दिव्यांची रोषणाईसोबतच चौरंग मांडून कुबेर आणि लक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे.

दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाचा दिवस व्यापाऱ्यांसाठीही महत्त्वाचा असतो. ते या दिवशी जमाखर्चाच्या चोपडीची पूजा केल्यानंतर नवी खाती उघडतात. म्हणून लक्ष्मीपूजनाच्या या दिवसाला सर्वच जण महत्त्वाचे मानतात.



हेही वाचा - 

नरकचतुर्दशी आणि अभ्यंगस्नानाचं काय आहे महत्त्व?

तुम्हाला माहीत आहे का? धनत्रयोदशीला 'यमदीपदान' का करतात?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा