Advertisement

तुम्हाला माहीत आहे का? धनत्रयोदशीला 'यमदीपदान' का करतात?


तुम्हाला माहीत आहे का? धनत्रयोदशीला 'यमदीपदान' का करतात?
SHARES

धनत्रयोदशी म्हटलं की सोने आणि इतर नवीन वस्तूंच्या खरेदीचा मुहूर्त. या मुहूर्तावर नवीन डिझाईनचे दागिने खरेदी करण्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानांत ग्राहकांची झुंबड उडते. दरवर्षीचं हे चित्र. पण धनत्रयोदशीचा खरा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? 


धनत्रयोदशी म्हणजे काय?

अश्विन महिन्यात येणाऱ्या त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात. या दिवशी धनाची पूजा करण्याची प्रथा आहे. मात्र ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी धान्य हेच त्यांचं 'धन' असतं. म्हणून शेतकरी या दिवशी धान्य, गूळ आणि धणे यांची पूजा करतात. धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती असंही म्हणतात. या दिवशी ‘यमदीपदान’ करण्याची प्रथा आहे. 




‘यमदीपदान’ का केलं जाते?

एका आख्यायिकेनुसार, एक व्यक्ती हेमराज नावाच्या राजाला सांगतो की, तुझ्या मुलाचा त्याच्या लग्नाच्या चौथ्या दिवशीच मृत्यू होईल. त्यानुसार राजपुत्राचा विवाह सुरू असताना सर्पदंशाने त्याचा मृत्यू होतो. त्यानंतर राजवाड्यात मोठा आक्रोश सुरू होतो. ते पाहून यमाचे दूतही व्यथित होतात. तेव्हा यमाचे दूत यमराजला विचारतात की, एखाद्यावर अपमृत्यूचा प्रसंग येऊ नये यासाठी काय करावं? तेव्हा यमराजने त्यांना त्यावरचा उपाय सांगितला. यमराज म्हणाले, अश्विन महिन्यात येणाऱ्या त्रयोदशीपासून चार दिवसापर्यंत मला दीप अर्पण करून जे व्यक्ती दीपोत्सव साजरा करतील; त्यांच्यावर अपमृत्यूचा प्रसंग ओढावणार नाही. म्हणून धनत्रयोदशीपासून पुढील चार दिवस दीपोत्सव साजरी करण्याची प्रथा आहे.



हेही वाचा - 

वसुबारस...दिवाळीचा शुभारंभ!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा