SHARE

ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने 'दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी' या गाण्यानेच दिवाळीच्या पहिल्या दिवसाला सुरुवात होते. अश्विन महिन्यात येणाऱ्या द्वादशीला 'वसुबारस' म्हणतात. याला 'गोवत्स द्वादशी' असेही म्हणतात. ‘वसू’ म्हणजे धन आणि 'वसुधा'चा अर्थ पृथ्वी म्हणजेच जमीन. ‘बारस’ म्हणजे द्वादशी, म्हणजेच संवत्सधेनू. या दिवशी गाय आणि वासराची पूजा करून त्यांना गोडाचा घास खाऊ घालण्याची प्रथा आहे.


निसर्ग आणि दिवाळी

भारतात बदलत्या ऋतुंनुसार सण साजरे केले जातात. मुळात भारतीय संस्कृती ही निसर्गपूजक आहे. त्यामुळे या सणालाही तितकेच महत्त्व आहे. बैलपोळ्याला शेतकरी ज्याप्रमाणे बैलांविषयी आपुलकीची भावना व्यक्त करतात, त्याप्रमाणे वसुबारसला गाय आणि वासरुविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. शेतीला सुरुवात झाल्यापासून गाय, बैल यांसारख्या दुभत्या प्राण्यांनी शेतकऱ्यांचा भार सांभाळला आहे. शेतीसाठी उपयुक्त असलेल्या या प्राण्यांविषयी शेतकरी प्रेम व्यक्त करतात.

निसर्गाशी जोडलेल्या ग्रामीण भागातल्या संस्कृतीचे दर्शन या दिवशी खऱ्या अर्थाने घडते. या दिवशी ग्रामीण भागातल्या गायी-गुरांना अंघोळ घातल्यानंतर त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घातल्या जातात.


सण आणि भारतीय संस्कृती

खेड्यांप्रमाणे शहरांमध्ये धावपळीच्या ठिकाणी मात्र या दिवशी तितकीशी धामधूम नसते. शहरातील लोकांना या दिवशी गायीची पूजा करता यावी, म्हणून हल्ली अनेक गावकरी गायींना शहरात आणतात. भारतीय सण नेहमीच आपल्याला निसर्गाशी कृतज्ञ राहण्याची शिकवण देतात.हेही वाचा

गिफ्ट, सुक्या मेव्याकडे ग्राहकांनी फिरवली पाठ


संबंधित विषय
ताज्या बातम्या