Advertisement

Diwali 2020 : दिवे कुठल्या दिशेला लावणं शुभ असतं? जाणून घ्या

दिवाळीला दिवे का लावले जातात? ते कुठल्या दिशेला लावावेत हे जाणून घेऊयात.

Diwali 2020 : दिवे कुठल्या दिशेला लावणं शुभ असतं? जाणून घ्या
SHARES

दिव्यांना प्रकाशाचे प्रतिक मानले जातं. दिव्यांची ज्योत स्वत: जळून दुसऱ्यांचं आयुष्य प्रकाशमय करते. पण दिवाळीला दिवे का लावले जातात? ते कुठल्या दिशेला लावावेत हे जाणून घेऊयात.

  • दिवाळी हा सण प्रकाशपर्व म्हणून ओळखला जातो. दिवाळी ही अमावस्येच्या दिवशी येते. जेव्हा सर्वत्र काळोख असतो. या काळोखाला दिव्याची एक छोटीशी ज्योत दूर करते.
  • दिवाळी आणि दिवा यांचे अतूट नाते आहे. प्रभू रामचंद्र विजयी होवून अयोध्येला परतले तेंव्हा अयोध्यावासीयांनी घरोघरी आनंद व्यक्त केला. दिवे लावले. आनंद व्यक्त करण्यासाठी दिवे लावण्याची आपली परंपरा आहे.
  • दिवाळीच्या दिवशी पूर्ण घरात दिवे लावणे, म्हणजे मारक ज्योतीतून पूर्ण घराला संरक्षण प्रदान करणे. या प्रकारच्या दीपज्योतीतून पूर्ण घराभोवती तेजोमय लहरींच्या चक्राकार स्वरूपाच्या कवचाची निर्मिती होऊन घरात व्याप्त असलेल्या अनिष्ट शक्तींचे स्थान नष्ट होत असल्यामुळे दिवे लावण्यात येतात.
  • दिव्याची ज्योत समाजाप्रती आपली जबाबदारी दर्शवते. स्वत: जळताना कितीही त्रास झाला तरी इतरांना त्यांच्या अंधारमय जीवनातून प्रकाशाकडे न्यावं, अशी प्रेरणा आपल्याला देते.
  • या दिवशी गाईच्या शुद्ध तुपाचाच दिवा लावावा. दिवाळीच्या दिवशी तुपाचे दोन दिवे घराच्या मुख्य द्वारावर लावल्यानं विष्णू देव आणि लक्ष्मी देवी प्रसन्न होते.
  • उतर दिवशी तुळशीच्या शेजारी दिवा लावल्यानं घरात सकारात्मक उर्जा राहते.
  • दिव्याची ज्योत कुठल्या दिशेनं असावी याचे देखील महत्व असते. पूर्व दिशेला ठेवल्यास पूर्व आयुष्य मिळते. उत्तर दिशेकडे ठेवल्यास धन, आरोग्य आणि समृद्धी मिळते.
  • दक्षिण दिशेला ठेवल्यास नुकसान होतं. पश्चिमेकडे ठेवल्यास दु:ख मिळतं.
  • ज्योत पेटवल्यानंतर ती विझवणं अशुभ मानलं जातं. याशिवाय दिव्याला दिवा लावून ज्योत पेटवणं अशुभ मानलं जातं.  



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा