मुंबईकरांना दिवाळी भेट

मुंबई - विक्रोळी ते लोखंडवाला फक्त 20 मिनिटं, ठाणे ते भिवंडी... 20 मिनिटं, भिवंडी ते कल्याण... 5 मिनिटं. सध्या तास दीड तास लागणारे, घामटं काढणारे हे प्रवास इतक्या कमी वेळात, सुखकर आणि सुरक्षितही होणार आहेत. कारण लोखंडवाला-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-6 आणि ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५ या मार्गांना राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. मेट्रो-5 मुळे तर ठाणे-कल्याण प्रवासासाठी रेल्वे, रस्त्यापलीकडे आणखी एक पर्यायही उपलब्ध होणार आहे.

मेट्रो 5 : ठाणे-भिवंडी-कल्याण

लांबी 24 किमी, अपेक्षित खर्च 8416 कोटी

एकूण स्थानकं 17

1. कल्याण APMC

2. कल्याण स्थानक

3. सहजानंद चौक

4. दुर्गाडी किल्ला

5. कोनगाव

6. गोवेगाव

7. MIDC

8. राजनोली गाव

9. टेमघर

10. गोपाळनगर

11. धामणकर नाका

12. अंजूर फाटा

13. पूर्णा

14. काल्हेर

15. कशेळी

16. बाळकुम नाका

17. कापूरबावडी

 

मेट्रो 6 : लोखंडवाला-जोगेश्वरी-विक्रोळी

लांबी 14.5 किमी अपेक्षित खर्च 6,672 कोटी

एकूण स्थानकं 13

1. लोखंडवाला संकुल

2. आदर्शनगर

3. मोमीननगर

4. जेव्हीएलआर

5. शामनगर

6. महाकाली गुंफा

7. सीप्झ गाव

8. साकी-विहार मार्ग

9. रामबाग

10. पवई तलाव

11. आयआयटी पवई

12. कांजूरमार्ग पश्चिम

13. विक्रोळी-पूर्व द्रुतगती मार्ग

राज्य सरकारनं घेतलेले हे निर्णय म्हणजे ऐन दिवाळीच्या तोंडावर सुखद प्रवासाची दिवाळी भेटच म्हणावी लागेल.

Loading Comments