Advertisement

शितलादेवी मंदिरात दत्त जयंती उत्सव


शितलादेवी मंदिरात दत्त जयंती उत्सव
SHARES

जोगेश्वरी - शितलादेवी मंदिर समिती गेल्या 20 वर्षापासून दत्त जयंती उत्सव साजरा करत आहे. या वर्षी दत्तजयंती उत्सवाचे हे 21 वे वर्ष असल्यामुळे उत्सवासाठी मंदिराला प्रति रायगडाच्या देखाव्यानं सजवलं. जोगेश्वरीतल्या पूर्व काकिची चाळ इथे हे शितलादेवीचं मंदिर आहे. इथं दत्तजयंती उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या उत्सवाची तयारी एक महिन्यापूर्वीच केली होती. या वेळी स्थानिक मुलांसाठी चित्रकला, निबंध स्पर्धा तसंच इतर सांस्कृतिक कार्यक्रम दत्तजयंतीच्या निमित्ताने पार पडतात. या शिवाय रक्तदान शिबीर, गरजूंना मोफत वह्यावाटप, महाप्रसाद वाटप इत्यादी सामाजिक उपक्रमदेखील दत्तजयंती सप्ताहात राबवले जातात. विभागातील 100 हून अधिक बालक इथं पार पडणाऱ्या विविध स्पर्धेत सहभाग घेतात. दत्तजयंती निमित्त पार पडणाऱ्या या सोहळ्यात जास्तीत जास्त भाविकांनी तिर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन शितलादेवी मंडळ समितीचे कार्यकर्ते अभिषेक चव्हाण यांनी केलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा