Advertisement

बाप्पा पावला! 'पीओपी' वापरावरील बंदीस स्थगिती

माघी गणेशोत्सवात पीओपीच्या गणेश मूर्तीवर बंदी राहणार नाही.

बाप्पा पावला! 'पीओपी' वापरावरील बंदीस स्थगिती
SHARES

येत्या काही दिवसांवर माघी गणेशोत्सव येऊन ठेपला असून, सर्व गणेशभक्त तयारीला लागले आहेत. शिवाय, मूर्तिकार ही आपल्या तयारीला लागले आहेत. परंतु, या मूर्तिकारांना यंदा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. 'पीओपी'च्या वापरावर बंदी घालण्यात आल्यानं अनेक मुर्तीकारांनी नाराजी व्यक्त केली. मात्र आता पीओपी वापरावरील बंदीस केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्थगिती दिली आहे.

पीओपी वापराबाबत केंद्रीय पर्यावरण खात्यानं अभ्यासगट नियुक्त केल्यानं त्यांचा अहवाल येईपर्यंत पीओपी वापरावरील बंदीस केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे माघी गणेशोत्सवात पीओपीच्या गणेश मूर्तीवर बंदी राहणार नाही.

भाजप आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी जावडेकर यांची दिल्लीत मंगळवारी पुन्हा भेट घेतली. पीओपीवरील बंदीचा फटका राज्यातील ५ लाख गणेश मूर्तीकार व कारागिरांना बसला आहे. केंद्र सरकारनं यासंदर्भात अभ्यास समिती नेमली आहे. माघी गणेशोत्सव जवळ आला आहे.

कोरोना लॉकडाऊनमुळं मूर्तीकार व कारागिरांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं समितीचा अहवाल येईपर्यंत पीओपी बंदीवरील स्थगिती उठवावी, अशी मागणी शेलार यांनी जावडेकर यांच्याकडे केली. जावडेकर यांनी त्याबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव प्रशांत गार्गव्ह यांना निर्देश दिल्याची माहिती शेलार यांनी दिली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा