कंदील गल्लीत यंदा स्वदेशी फ्लेव्हर

 Khar
कंदील गल्लीत यंदा स्वदेशी फ्लेव्हर
कंदील गल्लीत यंदा स्वदेशी फ्लेव्हर
कंदील गल्लीत यंदा स्वदेशी फ्लेव्हर
कंदील गल्लीत यंदा स्वदेशी फ्लेव्हर
कंदील गल्लीत यंदा स्वदेशी फ्लेव्हर
See all

माहीम - दरवर्षीप्रमाणे यंदाही माहीमची कंदील गल्ली सुरेख कंदिलांनी सजली आहे. पण यावर्षी एक वेगळेपण आहे... चिनी कंदिलांची जागा घरी तयार केलेल्या, पारंपरिक कंदिलांनी घेतलीये. उरी हल्ल्यानंतर माहीमच्या कंदिल गल्लीत 'चायनावाले' कंदिल विकले जाणार नाहीत, याची काळजी घेतली आहे असं एक व्यावसायिक वैभव पेडणेकर म्हणाले. अगदी 30 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंतच्या कंदिलांचा यामध्ये समावेश आहे. यंदा पारंपरिक कंदिलांना चांगला प्रतिसाद असल्याचंही ते म्हणाले. कपड्यांपासून बनवलेले पारंपारिक कंदील यावर्षी कंदील गल्लीचं आकर्षण ठरतायत.

Loading Comments