Advertisement

राजाचा दरबारही खाली खाली...


राजाचा दरबारही खाली खाली...
SHARES

एरव्ही गर्दीचा महापूर आणणाऱ्या लालबागच्या राजाचा दरबार मुसळधार पावसाने खाली करून टाकला. काळाचौकी, लालबाग, चिंचपोकळी आदी भागांमध्ये ढोपरभर पाणी तुंबल्यामुळे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी झुंबड उडवणाऱ्या भक्तांनी मंगळवारी मात्र राजाच्या दर्शनापेक्षा घर गाठणेच पसंत केले. त्यामुळे आजवरच्या गणेशोत्सवाच्या विक्रमी गर्दीच्या तुलनेत प्रथम राजाचा दरबार खाली खाली झालेला पाहायला मिळाला.

लालगाच्या राजाचे दर्शन म्हणजे कोणत्याही मुंबईकरांसाठी एक पर्वणीय क्षण असतो. लालबागच्या राजाचा नवस फेडण्यासाठी तसेच त्यांचे दर्शन घेण्यासाठी दहा ते सोळा तास रांगेत उभे राहण्याची भक्तांची तयारी असते. त्यामुळे एकप्रकारे लालबागमध्ये भक्तीचा मळा फुललेला पाहायला मिळतो. मुंबईतील कोणत्याही गणेशोत्सव मंडळाच्या गणपती मंडळात जेवढी गर्दी नसते, त्याहून अधिक विक्रमी गर्दी लालबागच्या राजाच्या मंडपात पाहायला मिळते. परंतु मंगळवारचा दिवस याला अपवाद ठरला. मंगळवारी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असताना हळूहळू राजाच्या मंडपातील गर्दीही ओसरू लागली. त्यामुळे मंडपात बाप्पाच्या दर्शनासाठी एरव्ही होणारी गर्दी दिसून येत नव्हती.

मुसळधार पावसाचा परिणाम लालबागच्या राजाच्या दर्शनावर पडल्यामुळे घराच्या बाहेर पडलेल्या मुंबईकरांना मदतीचा हात लालबागच्या राजाच्यावतीने देण्यात आला. अडकलेल्या लोकांना राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था लालबागच्या राजा सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने करण्यात आली होती.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा