Advertisement

११ दिवस बाप्पासाठी बनवा ११ प्रकारचे मोदक, रेसिपी खास तुमच्यासाठी...

दरवर्षी घरात उकडीचेच मोदक का होतात? असा प्रश्न अनेकदा बच्चे कंपनी विचारते. मग तुमच्यासाठी आम्ही मोदकाचे आणखी काही प्रकार सांगणार आहोत. मोदकाचे विविध प्रांतानुसार वेगवेगळे प्रकार आहेत.

११ दिवस बाप्पासाठी बनवा ११ प्रकारचे मोदक, रेसिपी खास तुमच्यासाठी...
SHARES

बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक... बाप्पाचं आगमन होताच मोदकांचा सुगंध प्रत्येक घरात दरवळतो. बहुतांशी घरात उकडीचे मोदक बनवले जातात. कधी एकदा बाप्पाला नैवेद्य दाखवला जातो याची वाट बघितली जाते. बाप्पाला नैवेद्य दाखवला की घरातली बच्चे कंपनी त्या मोदकांवर ताव मारते.

दरवर्षी घरात उकडीचेच मोदक का होतात? असा प्रश्न अनेकदा बच्चे कंपनी विचारते. मग तुमच्यासाठी आम्ही मोदकाचे आणखी काही प्रकार सांगणार आहोत. मोदकाचे विविध प्रांतानुसार वेगवेगळे प्रकार आहेत. मोदकाचं आवरण सारखं असलं तरी सारणामध्ये आपण विविधता आणू शकतो.


१) पुरणाचे मोदक


पुरणपोळ्यांचा आस्वाद तुम्ही अनेकदा घेतला असेल. पण यावेळी काही तरी वेगळं म्हणून तुम्ही पुरणाचे मोदक बनवू शकता. यासाठी तुम्हाला पुरणाचं सारण मैदाच्या पारीमध्ये भरून त्याचे मोदक वाफवून किंवा तळून घेता येतील.


२) काजू मोदक

काजू मोदक करताना काजूची पूड आणि वेलची पावडर एकत्र करावी. त्यानंतर यामध्ये थोडासा खवा मिक्स करावा. त्यानंतर याला मोदकाचा आकार द्यावा.


३) गुलकंदाचे मोदक



तांदळाची उकड काढावी. त्यानंतर त्यात गुलाब पाकळ्या किंवा थोडं गुलाबपाणी मिक्स करावे. त्यानंतर उकडीमध्ये गुलकंदाचे सारण भरूण हे मोदक मंद आचेवर तळून किंवा वाफवून घ्यावेत. गुलकंद तुम्हाला दुकानांमध्ये देखील मिळेल. गुलकंदामध्ये तुम्हाला हवं असल्यास ड्रायफ्रुट्सदेखील टाकता येतील.


४) चॉकलेट मोदक



खवा, खोबरे, दाणे, एकदम बारीक करून त्याला मोदकाचा आकार द्या. एकेका मोदकाला हॉट चॉकलेट सॉसमध्ये बुडवून फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.


५) पंचखाद्याचे मोदक



पंचखाद्य म्हणजे खारीक, खसखस, बदाम, काजू आणि साखर एकत्र करून सारण मैदाच्या पारीत भरून डीप फ्राय करा. हे मोदक चवीला स्वादिष्ट आणि आरोग्यदायी असतात.


6) गूळ-कोहळ्याचे मोदक



विदर्भात अशा प्रकारचे मोदक बनवले जातात. गूळ, लाल कोहळा आणि तेवढंच कणिक घेऊन एकत्र मळावे. त्यानंतर मोदकाचा आकार देऊन मंद आचेवर तळावे.


७) पनीरचे मोदक



आतापर्यंत आपण पनीरचे अनेक प्रकार पाहिले असतील. पण पनीरचे मोदक बनतात हे तुमच्यासाठी नवीन असावे. दिल्लीमध्ये पनीरचे मोदक बनवले जातात. पनीर मोदकासाठी पनीरमध्ये साखर, काजू, किसमिस, वेलची पावडर एकत्र करून सारण करावे. हे सारण रवा किंवा मैद्याच्या पोळीमध्ये भरून तळून काढावे.


८) तिळगुळाचे मोदक



यवतमाळ भागात तिळी चतुर्थीला याचा नैवेद्य दाखवतात. गुळाचा पाक तयार करून त्यात भाजलेले तीळ घालावे. हे सारण कणकेच्या सारीमध्ये भरून मंद आचेवर तळावे. अजून एक पद्धत म्हणजे तीळ आणि गुळाचे सारण गरम असतानाच मोदकाच्या साच्यामध्ये टाकून मोदक करून घ्यावेत.


९) डिंकाचे मोदक



डिंक तळून डिंकाच्या लाडवाचे मिश्रण करावे. हे मिश्रण कणकेच्या पारीत भरून मंद आचेवर तळून घ्यावे.


१०) बेसनाचे मोदक



बेसनाच्या पिठात अंदाजे तूप टाकून ते भाजून घ्यावे. लाडू बनवण्याएवजी बेसनाचे सारण मोदकाच्या साच्यात घालून मोदक बनवून घ्यावा.


११) केळीचे मोदक



केळी, ओले खोबरे, दुध, खोबरे, गुळ या मिश्रणाचे मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावी. पेस्टमध्ये थोडी वेलची पावडर आणि भाजलेला रवा घालावा. पेस्ट थोडी पिठासारखी झाली की त्याला मोदकाचा आकार देऊन तळून घ्यावा.





Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा