आज पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप

 Mumbai
आज पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप

मोरया मोरया या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात  घरोघरी बाप्पाचे आगमन झाले होते.  त्यानंतर पाच दिवस मनोभावे पूजा करून बाप्पांना  आज  निरोप दिला जाणार आहे. विसर्जनानिमित्त मुंबईतल्या चौपाट्यांवर भक्तमंडळी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्याची शक्यता आहे. त्यासाठी गिरगाव चौपाटीवर सकाळपासूनच भाविकांची गर्दी दिसत आहे. काही भक्तांनी विसर्जनासाठी खास तयारीही केली आहे. त्यामुळे पालिकेतर्फे विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यासह पोलीसांचा कडेकोड बंदोबस्त करण्यात आला आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर भागातही पाच दिवसांच्या बाप्पांना

विधिवत निरोप देण्यात येईल...

 

Loading Comments