Advertisement

'जीएसबी'ने काढला भाविकांच्या सुरक्षेसाठी 10 कोटींचा विमा


'जीएसबी'ने काढला भाविकांच्या सुरक्षेसाठी 10 कोटींचा विमा
SHARES

सोने, चांदी आणि हिरे, माणिक-मोत्यांच्या अलंकारांनी नखशिखांत आभूषित वडाळ्यातील जीएसबी मंडळाचा गणपती मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणूनही ओळखला जातो. या गणपतीला कोट्यवधींचे दागिने भाविक अर्पण करत असतात. सुरक्षेचा विचार करता या मंडळाने यावर्षी भाविकांच्या सुरक्षेसाठी 10 कोटींचा विमा काढला आहे.
गौड सारस्वत ब्राह्मण (जीएसबी) सेवा मंडळाचा हा गणपती आहे. भाविक या मंडळाच्या गणरायाला कोट्यवधींचे दागिने दान करतात. 1955 दरम्यान मुंबईतील सारस्वत समाजातील काही गणेशभक्तांनी या गणेशोत्सवाची सुरुवात केली. यंदा या मंडळाचे 64वे वर्षे आहे.


10 कोटींचा विमा

वडाळ्याच्या राम मंदिरात जीएसबी मंडळाच्या वतीने गणपती उत्सव साजरा करण्यात येतो. या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होत असते. यामुळे मंडळाच्या वतीने मोठा बंदोबस्त ठेवला जातो. महिलांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशामध्ये पोलिस तसेच सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी तब्बल 10 कोटी रुपयांचा विमा मंडळाने काढला आहेत.

या मंडळाच्या बाप्पाला सोन्याचे दागिने भाविक मोठ्या प्रमाणावर अर्पण करत असतात. त्यामुळे या दागिन्यांचाही विमा मंडळाकडून काढण्यात आला आहे. मागील वर्षी गणपतीचा विमा 259 कोटी रुपयांचा होता. यावर्षी नेमकं किती रुपयांचा दागिन्यांचा विमा काढला? याविषयी बोलण्यास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.


मंत्री,सेलब्रेटी घेतात दर्शन


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांच्यासह अभिनेते अमिताभ बच्चन या गणेशाचे दर्शन घेणार असल्याची माहिती मिळत आहे. तर या मंडळाच्या समितीकडून वर्षभर विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा