कुर्ल्यात ख्रिसमस कार्निव्हलची धूम

 Kurla
कुर्ल्यात ख्रिसमस कार्निव्हलची धूम
कुर्ल्यात ख्रिसमस कार्निव्हलची धूम
कुर्ल्यात ख्रिसमस कार्निव्हलची धूम
कुर्ल्यात ख्रिसमस कार्निव्हलची धूम
See all

कुर्ला - रविवारी कुर्ल्यात ख्रिसमस कार्निव्हलची धूम पाहायला मिळाली. कुर्ला गाव ख्रिश्चन सिटिजन फोरमच्या वतीनं कोहिनूर हॉस्पिटल ते होलिक्रॉस चर्चपर्यंत या कार्यक्रमांतर्गत एक फेरी काढण्यात आली. या वेळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच डीजेवर थिरकताना दिसले. एवढंच नाही तर विविध प्रकारची वेश-भूषा केलेली बच्चेकंपनीही पाहायला मिळाली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात सगळ्या जाती-धर्मातल्या लोकांनी सहभाग घेतला होता. दोन वर्षांपासून या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातंय.

Loading Comments