Advertisement

Navratri 2020: नवरात्रौत्सव साधेपणानं, पण अनेकांच्या व्यवसायावर आर्थिक संकट

दरवर्षी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रौत्सव मंडळं व आयोजक ९ दिवस दांडियारास गरबा तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करतात.

Navratri 2020: नवरात्रौत्सव साधेपणानं, पण अनेकांच्या व्यवसायावर आर्थिक संकट
SHARES

राज्यावर कोरोनाचं (corona) सावट अद्यापही कायम असल्यानं गणेशोत्सवानंतर नवरात्रौत्सवही (navratri) साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. मंदिर (temple) उघडण्याची परवानगी अद्याप सरकारनं दिलेली नसल्यानं भक्तांना घरूनच देवीला नमस्कार करावा लागणार आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रौत्सव मंडळं व आयोजक ९ दिवस दांडियारास गरबा तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करतात. परंतू, यंदा गर्दी न करण्याच आवाहन सरकारनं (state government) केल्यामुळं मुंबईतील मंडळांनी गर्दी होईल असे कोणतेही उपक्रम न आयोजित करता त्याऐवजी रक्तदान शिबिर, गरजू रुग्णांना साहित्याचे वाटप, कोविड योद्ध्यांचा सन्मान तसंच, नारी शक्तीचा सन्मान असे लोकोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे.

मुंबईत (mumbai) दरवर्षी सुमारे अडीच हजार मंडळं नवरात्रौत्सव साजरा करतात. मात्र यंदा अनेक मंडळांनी नवरात्रौत्सव रद्द केला असून, काही मंडळांनी केवळ घट बसवून छोट्या स्वरूपात सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेल्या नियम व अटींमुळे नवरात्रौत्सवावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात झळ बसली आहे. मूर्तिकार, ढोल-ताशा पथक, ऑर्केस्ट्रा, डेकोरेटर्स, फुल व हारवाले, मिठाईची दुकानं, नवरात्री विशेष कपड्यांची दुकानं तसंच, दांडिया विकणाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलं आहे.

कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकड़ून (police) बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसंच नवरात्रौत्सव मंडळांसोबत बैठका घेत त्यांना नियमांचं पालन करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करू नये, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे. काही मंडळांनी नवरात्रीच्या ९ दिवसांमधील ९ रंग समाजातील प्रत्येक घटकास समर्पित करण्याचे ठरविले आहे. शासनाच्या आदेशानुसार अनेक मंडळांनी जाहिरातींच्या द्वारे आरोग्यविषयक सामाजिक संदेश पोहोचविण्याचे नियोजन केले आहे.

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेबाबत जनजागृती करण्यास पुढाकारदेखील घेतला आहे. गर्दी होईल असे कोणतेही उपक्रम न आयोजित करता त्याऐवजी रक्तदान शिबिर, गरजू रुग्णांना साहित्याचं वाटप, कोविड योद्ध्यांचा सन्मान तसंच नारी शक्तीचा सन्मान अशा लोकोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. तर काही मंडळांनी नवरात्रीच्या ९ दिवसांमधील नऊ रंग समाजातील प्रत्येक घटकास समर्पित करण्याचं ठरविलं आहे. 



हेही वाचा -

Navratra Utsav 2020 : मुंबादेवी! मुंबईची ग्रामदैवत

Navratri 2020: नवरात्रोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची संख्या कमी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा