Advertisement

Navratri 2020: नवरात्रोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची संख्या कमी

दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या नवरात्रोत्सवात ग्राहकांची संख्या कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Navratri 2020: नवरात्रोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची संख्या कमी
SHARES

नवरात्रोत्सवासाठी (navratri) संपूर्ण मुंबई (mumbai) सज्ज झाली असून, देवीच्या आगमनासाठी मोठी तयारी केली जात आहे. आकर्षक देखावे सादर केले जात असून, नवरात्रोत्सवाच्या खरेदीची लगबग ही सुरू झाली आहे. परंतू, यंदाच्या नवरात्रोत्सवावर गणेशोत्सवाप्रमाणं कोरोनाचं (corona) सावट आहे. त्यामुळं नवरात्रोत्सव देखील नियम व अटींचा बंधनात साजरा होत आहे. यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या नवरात्रोत्सवात ग्राहकांची संख्या कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

नवरात्रोत्सवासाठी मुंबईतील सर्व मिठाईची दुकाने सज्ज झाली आहेत. परंतू, वाढता प्रादुर्भाव व मानसिक ताणामुळं अनेकांनी घराबाहेर पडणं टाळलं आहे. गणेशोत्सवानंतर देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळं नागरिक अद्यापही बाहेरील खाद्यपदार्थांना नापसंती दर्शवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नवरात्रोत्सवासाठी अनेक भाविक मिठाई घेण्यासाठी दरवर्षी आवर्जून मिठाईच्या दुकानांमध्ये जात असतात. हेच लक्षात घेता दुकानदारांनी मिठाईच्या दुकानांमध्ये दरवर्षी पेढे, लाडू, बर्फी, मोदक व जिलेबी यांसारखे विविध गोड पदार्थ ठेवले.

नैवेद्य व प्रसाद यांसाठी लागणाऱ्या मिठाईची (sweets) ऑर्डर देण्यासाठी आठवडाभर आधीच मिठाईच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी असते. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे मिठाईची मागणी कमी झाली असून, ग्राहकांनी दुकानांमध्ये संख्या देखील कमी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिठाईच्या दुकानांमध्ये सुरक्षेची सर्व खबरदारी घेण्यात आली आहे.

दरवर्षीच्या तुलनेत ग्राहकांची संख्या रोडावल्याने मिठाई व्यापाऱ्याची काही प्रमाणात निराशा झाली आहे. गणेशोत्सवा प्रमाणे यंदाच्या नवरात्रोत्सवावर देखील कोरोनाचे सावट आहे. तसंच नियमावली देखील आखून दिल्यानं नागरिक घराबाहेर पडू लागले असले तरीदेखील बाहेरचे पदार्थ खाण्याबाबत विचार करीत आहेत.

सण व उत्सवांमध्ये नागरिक मिठाईला सर्वात आधी पसंती दर्शवितात. मात्र यावर्षीच्या मार्च महिन्यापासून पासून व्यवसायाचे नुकसान झाले आहे. अद्यापही मिठाईचा व्यवसायाने उभारी घेतली नाही. सुरक्षेच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन केलं जात असून, सॅनिटायझर, मास्क, फेस शील्ड, एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर या सर्व गोष्टींना प्राधान्य देण्यात आले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा