Advertisement

विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई पोलीस सज्ज


विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई पोलीस सज्ज
SHARES

मुंबई - येत्या गुरुवारी 10 दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन होणार आहे. विसर्जनासाठी गणेशभक्तांसोबत पोलीसही सज्ज झालेत. मुंबईतील प्रत्येक रस्त्यावर भाविकांची विसर्जनानिमित्त गर्दी होणार आहे. मात्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवात शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे अशा स्थितीत वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. गणरायाच्या विसर्जनावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. दरम्यान विसर्जनाच्या कालावधीत मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

विसर्जनानिमित्त करण्यात आलेली सोय

विसर्जनानिमित्त 49 रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.
55 रस्त्यांवरील वाहतूक एकेरी मागार्ने सुरू राहणार आहे.
18 रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी असेल.
99 रस्त्यांवरील पार्किंग विसर्जन कालावधीत बंद राहणार आहे.
तसंच विसर्जन ठिकाणांवरील सुरक्षा आणि वाहतुकीच्या नियोजनासाठी ड्रोनची मदत घेतली जाणार आहे.
तसंच बंदोबस्तासाठी तब्बल 14 हजार सशस्त्र पोलिसांची फौज रस्यावर तैनात असणार आहे.
विसर्जनाच्या मार्गावर वॉच टॉवर उभारले जाणार आहेत.
मुख्य नियंत्रण कक्षातून कॅमे-यांद्वारे नजर ठेवता येणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement