नवरात्रौत्सव २०१९ : मुंबईतल्या 'या' ५ ठिकाणी गरब्याच्या तालावर 'हालो रे हालो'

हल्ली गरब्याला इव्हेंटचं स्वरूप आलं आहे. अनेक ठिकाणी गरब्याचे इव्हेंट्स आयोजित केले जातात. आम्ही देखील तुम्हाला मुंबईत गरबा कुठे खेळाल हे सांगणार आहोत.

नवरात्रौत्सव २०१९ : मुंबईतल्या 'या' ५ ठिकाणी गरब्याच्या तालावर 'हालो रे हालो'
SHARES

गणपती झाले की वेध लागतात नवरात्रीचे. आणि नवरात्र म्हटलं की आठवतो तो नऊ दिवस खेळला जाणारा गरबा किंवा दांडिया हा नृत्यप्रकार. सगळे जण नवरात्रीमधील रास- दांडियाची अगदी आतुरतेनं वाट बघत असतात. हल्ली गरब्याला इव्हेंटचं स्वरूप आलं आहे. अनेक ठिकाणी गरब्याचे इव्हेंट्स आयोजित केले जातात. आम्ही देखील तुम्हाला मुंबईत गरबा कुठं खेळाल हे सांगणार आहोत


) नवरात्री उत्सव विथ फाल्गुनी पाठक, बोरीवली

गरबा-दांडिया आणि फाल्गुनी पाठक हे एक समीकरणच आहे. ‘मैने पायल है छनकाई.’, ‘चुनरी उड उड जाए.’, ‘चुडी जो खनकी हाथों में.’, ‘ओ पिया ओ पिया लेके डोलिया’, ‘सावरिया तेरे याद में’पासून अगदी गुजराती पारंपरिक गरब्याच्या गाण्यांपर्यंत फाल्गुनी पाठक गाऊ लागते तेव्हा आपोआप आपलीही पावले त्या ठेक्यावर नृत्य करू लागतात. फाल्गुनी पाठक आणि रास गरबा या समीकरणासाठी हजारो तरुण-तरुणी या उत्सवाची वाट बघत असतात. यावर्षी ही ‘दांडिया क्वीन’ फाल्गुनी पाठक मुंबईत असून बोरिवलीमध्ये परफॉर्म करणार आहे.