पायधुनीची महाकाली

जे.जे.मार्ग - पायधुनी येथील महाकाली मातेच्या मंदिराची स्थापना १७६२ साली करण्यात आली होती. कासार समाजाचे रक्षण करण्यासाठी ही देवी २५० वर्षांपासून येथे वास करत आहे. असे येथील भक्तांनी सांगितले. मुंबईत ब्रिटीशकालीन विहिरी आहेत, त्यात या देवीचा उगम झाला. या मंदिरात गेली ७ वर्षे एकच विश्वस्त आहेत.हे जागृत देवस्थान असल्यामुळे भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या मंदिरात नवरात्रोत्सव पारंपारिक पध्दतीत साजरा केला जातो. या मंदिराचा एेतिहासिक वारसा अजूनही तसाच जोपासून ठेवला आहे. महाकाली असली तरी ही शुध्द शाकाहरी देवी आहे. महाप्रसादचा लाभ घेण्यासाठी भक्त येतात.

Loading Comments