Advertisement

‘या’ दिवशी सिद्धिविनायकाचं दर्शन बंद


‘या’ दिवशी सिद्धिविनायकाचं दर्शन बंद
SHARES

प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिर १५ जानेवारी ते १९ जानेवारीपर्यंत दर्शनासाठी बंद राहणार आहे.  या कालावधीत श्री गणेशाच्या मूर्तीवर सिंदूर लेपन करण्यात येणार असल्याने भाविकांना बाप्पाचं दर्शन घेता येणार नाही. 

येत्या २५ जानेवारीपासून १ फेब्रुवारी २०२० या कालावधीत सिद्धिविनायकाच्या मंदिरात माघ श्रीगणेश जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाआधी श्री गणेशाच्या मूर्तीवर सिंदूर लेपन करण्यात येतं. त्यानुसार सिंदूर लेपनासाठी १५ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान श्रींचं दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत भाविकांना श्रींच्या प्रतिमूर्तीचं दर्शन घेता येईल, अशी माहिती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे देण्यात आली आहे.

२० जानेवारी रोजी श्रींच्या मूर्तीचा प्रोक्षणविधी, नैवेद्य आणि आरती झाल्यानंतर दुपारी १ वाजता भाविकांना गाभाऱ्यातून श्रींचे दर्शन घेता येणार आहे, अशी माहितीही न्यासातर्फे देण्यात आली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement