Advertisement

गणेशमंडळांना मोफत खाजगी सुरक्षा


गणेशमंडळांना मोफत खाजगी सुरक्षा
SHARES

गणेशोत्सव म्हटल्यास भले मोठे मंडप आणि त्याबाहेर लागलेल्या भाविकांच्या लांबच लांब रांगा या आल्याचे. या दरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असला तरी वाढत्या गर्दीला नियंत्रण करणे पोलिसांना देखील कठीण होऊन जाते. पोलिसांचा भार हलका करण्यासाठी तसेच आपली सामाजिक बांधिलकी या नात्याने 'टॉप्स सेक्युरिटी' मुंबईतील मोजक्या पण महत्त्वाच्या मंडळांना मोफत सुरक्षा तसेच वैद्यकीय सेवा पुरवली आहे. टॉप्स सेक्युरिटी ने आपली 'टॉप्सलाईन १२५२ लाईफ ब्रिगेड' नावाची सर्व्हिस या सर्व मंडळांना दिली असून कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यात ही सर्व्हिस सुसज्ज असल्याचा दावा टॉप्स ने केला आहे. टॉप्सलाईनची ही एम्ब्ल्यूलंस आगीचा तसेच रेस्क्यू ऑपरेशन करण्यास समर्थ असून कित्येगदा उन्हाने तसेच रांगेत बराच वेळ उभे राहिल्याने भाविकांना त्रास होतो. त्यांना प्रथमोपचार देण्यात देखील ही सर्व्हिस सक्षम असल्याचे कंपनीने म्हटले आहे. टॉप्सने मुंबईचा राजा, जीएसबी सेवामंडळ, बाळ मित्र मंडळ विक्रोळी, महाराष्ट्र स्नेहवर्धक मंडळ बोरिवली, अंधेरीचा महा गणपती या सगळ्यांना ही सेवा अगदी मोफत दिली आहे. 

 

संबंधित विषय
Advertisement